निवास व अन्य व्यवस्थांच्या मर्यादांचा विचार करत निवडक विद्यार्थी-संख्या निश्चित करुन त्यांना गुरुकुलासाठी प्रवेश दिला जाईल. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आवेदन-पत्र (form) भरणे आवश्यक आहे. ज्यांनी आवेदन पत्रे भरली आहेत, त्यांच्यातून निवडप्रक्रियेद्वारे नियोजित संख्ये-एवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या विद्यार्थ्यांनी गुरुकुलाचे शुल्क भरून पुढे गुरुकुलामध्ये सर्व दिवस निवासी राहून शिक्षण घेणे अपेक्षित आहे. त्यांच्यासाठीच्या विशेष सूचना गुरुकुलापूर्वी सांगण्यात येतील.
- आवेदन-पत्रासह नोंदणी शुल्क १००/- भरणे अपेक्षित आहे.
- आवेदनपत्र (form) भरताना प्रत्येक प्रश्न नीट वाचून विचारपूर्वक उत्तरे लिहावीत. त्या उत्तरांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ही उत्तरे मराठी भाषेमध्ये व देवनागरी फॉंट-मध्ये लिहावीत.
- विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संपर्क क्र. (phone number) & E-mail id वर पुढील सर्व सूचना पाठविण्यात येतात, त्यामुळे तो व्यवस्थित लिहावा.
- अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलाखतीद्वारे निवडक विद्यार्थ्यांची गुरुकुलासाठी निवड करण्यात येईल. त्या संदर्भात अधिक माहिती योग्य वेळी संबंधित विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात येईल. निवड प्रक्रिया व त्यामध्ये यथावश्यक बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापन समितीकडे असतील.
- आवेदन-पत्र भरण्याचा अंतिम दिनांक ०२ जानेवारी २०२५ आहे. मुलाखती या ऑनलाईन पद्धतीने ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये घेतल्या जातील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी त्यानंतर अल्प कालावधीमध्येच घोषित येण्यात येईल.
पुढील अर्ज हा मोबाईलऐवजी कॉम्प्युटर / लॅपटॉपवरुन भरणे अधिक सोपे जाते.
विद्यार्थी गुरुकुल आवेदन पत्र