गुरुकुलाबद्दल प्राथमिक माहिती

21 Jun 2023 11:09:37

आयुर्वेद व्यासपीठ ही गेल्या २५ वर्षांपासून आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये “कृण्वन्तो विश्वं स्वस्थम्।“ या उद्देश्याने कार्यरत असलेली संघटना आहे. सेवा, संशोधन, शिक्षण व प्रचार या चतुःसूत्रीच्या आधारे विविध पातळ्यांवर आयुर्वेद व्यासपीठाचे काम सुरु आहे. आयुर्वेदातील विद्यार्थी, शिक्षक, चिकित्सक व अशा अन्यही घटकांना एकत्र आणणे व त्याद्वारे त्यांचे प्रश्न सोडवत, त्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आयुर्वेद हे जागतिक पातळीवर प्रथम दर्जाचे वैद्यकशास्त्र प्रस्थापित करणे हा व्यासपीठाच्या कामाचा गाभा आहे. याच उद्देश्याने आयुर्वेद व्यासपीठ वेळोवेळी विविध कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन करत असते.

चतुःसूत्रीपैकी “शिक्षण”संबद्ध उपक्रमांचा केंद्रबिंदू हा निश्चितच आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे. या विद्यार्थीदशेमध्येच आयुर्वेद शिक्षणाचा पाया असलेल्या ग्रंथांचे अध्ययन कसे करावे, हे बारकाईने शिकणे बऱ्याचदा राहून जाते. बहुतांशी विद्यार्थ्यांना आपल्याला मूळातून आयुर्वेद कळावा याबद्दलची ओढ असते, मात्र ग्रंथांच्या अध्ययनाबद्दल योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास विद्यार्थी आयुर्वेदीय चिकित्सक होण्याचे स्वप्न पाहणे सोडून देतात. याच अडचणीवर मात करण्यासाठी संघटनात्मक प्रयत्नांचा एक भाग म्हणजे आयुर्वेद व्यासपीठाद्वारे नियोजित “गुरुकुल”.

मूळात आयुर्वेदीय ग्रंथांचे व्यवस्थित अध्ययन केल्यास पदरी काय पडते? तर –

अतः विद्यार्थ्यांच्या मनातील ग्रंथांबद्दलची भीती दूर करून वाचनाबद्दल रुची उत्पन्न करणे, सवय लावणे, शंका-समाधान करणे व अर्थात त्यांना आयुर्वेदीय चिकित्सक बनण्यासाठी प्रेरित करणे या उद्देश्याने आयुर्वेद व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठीच्या ’गुरुकुला’चे नियोजन करत आहे. यापूर्वी याच हेतूने आयोजित वैद्यांसाठीच्या गुरुकुलाचे चार भाग पूर्णही झाले आहेत.

हा निवासी उपक्रम असून यामध्ये आयुर्वेदातील मूळग्रंथांपैकी एका ग्रंथामधील विशिष्ट भागाचे वैद्यांकडून अध्यापन केले जाते. अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी लागणारा आवश्यक कालावधी निश्चित करून तितक्या दिवसांच्या निवासी गुरुकुलाचे नियोजन केले जाते. या अभ्यासक्रमामध्ये –

 

यासाठी तीन-तीन दिवसांच्या कालावधीसाठी तीन-तीन अध्यापकांचा गट गुरुकुलस्थानी मुक्कामी असतील. म्हणजे १८ किंवा त्याहूनही अधिक गुरुवर्यांचा दीर्घ सहवास मिळण्याची ही नामी संधी असणार आहे.

या उपक्रमातील तृतीय गुरुकुल ’प्रथम वर्ष बी.ए.एम्.एस्.’च्या (जून २०२४ मध्ये विद्यापीठाच्या प्रथम वर्ष परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या) विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेनंतरच्या कालावधीमध्ये हे गुरुकुल घेतले जाईल. याचा कालावधी साधारण १८ दिवसांचा असेल. त्यासाठीचा अभ्यासक्रम ’अष्टांगहृदय सूत्रस्थान व शारीरस्थान – संपूर्ण’ व ’टीका-वाचनार्थ – अष्टांगहृदय सूत्रस्थान ११ वा अध्याय’ असा असेल. यासाठीचे काही बारकावे पुढीलप्रमाणे –

प्रवेश संख्या – ५० विद्यार्थी
स्थळ – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर, मुंबई
अध्यापनाचे माध्यम – मराठी
संभाव्य कालावधी - ऑगस्ट २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यापासून पुढे १८ दिवस

वाग्भटाचे सूत्रस्थान व शारीरस्थान म्हणजे जणू काही आयुर्वेदातील सर्व व्यवहारांचा पाया. तोही सर्वांना समजावा म्हणून सोप्या संस्कृतमध्ये, पद्धतशीरपणे मांडलेला. एकदा हा पाया भक्कम झाला की त्यावर बृहत्त्रयी व अन्य आयुर्वेदीय साहित्याच्या आधारे आपली उंच इमारत उभी करणे शक्य होते. आणि म्हणूनच या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे अध्ययन आदर्श पद्धतीने करण्याची संधी आयुर्वेद व्यासपीठ हे आपल्यासमोर गुरुकुल-रूपाने घेऊन येत आहे. 


विद्यार्थी गुरुकुल आवेदन पत्र भरताना सूचना विद्यार्थी गुरुकुल आवेदन पत्र
 
अधिक माहिती साठी संपर्क करा vgurukul.ayurvedvyaspeeth@gmail.com 
Powered By Sangraha 9.0