अध्यापक मराठी भाषेतूनच सूत्रांचे स्पष्टीकरण करणार आहेत. हिंदी मध्ये प्रत्येक वेळी पुन: स्पष्टीकरण करणे / सारांश सांगणे वेळेअभावी शक्य होणार नाही. मराठी व्यवस्थित समजत असल्यास जरुर प्रवेश घ्यावा. व्यवहाराला अडचण येणार नाही.
मुलाखती ऑनलाईन पद्धतीने होतील. मुलाखतीच्या email मधे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असेल. गुरुकुल समितीचा निर्णय याबात अंतिम असेल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क भरण्यापूर्वी याविषयी पूर्ण कल्पना(Cancellation Policy) देण्यात येईल.
नाही. एकदा गुरुकुल चालू झाले की त्यानन्तर अत्यंत अपरिहार्य कारणाशिवाय व व्यवस्थापकांच्या परवानगी शिवाय गुरुकुल स्थान सोडता येणार नाही.
गुरुकुलस्थानी यायची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वतःच करायची आहे. त्या स्थानाबद्दलची सर्व माहिती निवड झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल. गुरुकुलस्थानी पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थी एकाच campus मध्ये असतील.
होय. विद्यार्थ्याबरोबर सर्व दिवस पूर्ण वेळ किमान एक स्त्री अध्यापक / coordinator असेल.
निवासस्थान सुरक्षित असून तेथील सर्व व्यवस्थांची स्वच्छता नियमितपणे ठेवली जाते.
गुरुकुलाच्या स्थानानुसार तसेच विद्यार्थीसंखेनुसार डॉर्मेटरीज् अथवा रुमस् मध्ये मुला-मुलींची स्वतंत्र निवास-व्यवस्था केली जाते.
गुरुकुल काळात फोनचा कमीत कमी वापर करणे अपेक्षित आहे. सत्राचे वेळी फोन वापरता येणार नाही. आवश्यक तेवढे संपर्क करण्याइतपत range नक्की आहे.
शाकाहारी भोजन, नाश्ता व चहा यांची व्यवस्थितरित्या, तेथील दिनचर्येला अनुकूल अशाप्रकारे सोय केली जाते.
पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत पर्यंत - पाठान्तर, योगाभ्यास, अध्ययन, टीका वाचन, अनौपचारिक चर्चा अशी सत्रे असतील. दिवसभरात भोजन व थोडी विश्रान्ती यासाठी पुरेसा अवधी आहे.
परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला लगेच उपक्रमात सहभागी होता येईल. शक्य झाल्यास आधीच्या दिवसांचे recording देण्याचा प्रयत्न करू. त्या दिवसांचे शुल्क परत दिले जाऊ शकणार नाही.
गुरूकुल चालू असताना अशी परवानगी मिळत नाही. आवश्यकतेनुसार पालकांशी फोनवर संपर्क करावा.
माहिती पत्रकात दिलेले फोन क्रमाङ्क वा तेथे गेल्यावर तेथे असणाऱ्या Co-ordinators चे क्रमाङ्क विद्यार्थ्यांना दिले जातील. ते त्यांनी पालकांना कळविणे अपेक्षित आहे. केवळ तातडीच्या कामासाठीच त्यांना संपर्क करावा. सामान्य बाबींसाठी त्यांना त्रास देऊ नये.
विद्यार्थ्यांना नेहमी होणारे आजार व त्यासाठीची औषधे त्यांनी जवळ ठेवावीत. तेथे ऐनवेळी होणाऱ्या आजारपणांसाठी प्राथमिक स्वरूपाच्या उपचारांची व्यवस्था असेल. तेथे उपचार शक्य नसल्यास पालकांशी संपर्क करून जवळच्या रुग्णालयात स्वखर्चाने व्यवस्था होऊ शकते